शरीराच्या कानाकोपऱ्यात अडकून राहिलेले Uric acid बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
युरिक अॅसिड वाढल्यानंतर नियमित बीट, गाजर आणि काकडीचे मिश्रण तयार करून बनवलेल्या पेयाचे सेवन करावे. या पेयाच्या सेवनामुळे शरीरात वाढलेले युरिक अॅसिड कमी होईल, यासोबतच विषारी घटक सुद्धा बाहेर पडून जातील.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करावे. दुधी भोपळ्याचा रस शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये फायबर आणि पोटॅशियम इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात.
विटामिन सी युक्त लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील सर्वच आजारांपासून सुटका होईल. युरिक अॅसिड वाढल्यास हातापायांच्या बोटांमध्ये जळजळ किंवा वेदना होत असतील तर लिंबू पाणी प्यावे.
दीर्घकाळ निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. नियमित एक सफरचंद किंवा सफरचंदचा रस प्यायल्यामुळे संधिवाताची लक्षणे कमी होऊन जातात.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आणि सांध्यांमधील युरिक अॅसिडचे क्रिस्टल बाहेर काढून टाकण्यासाठी काकडीचा रस प्यावा. काकडी शरीर हायड्रेट ठेवते.