शरीरातील High Uric Acid कायमचे नष्ट करण्यासाठी आहारात करा 'या' ड्रायफ्रुट्सचे सेवन
दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले अक्रोड आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवाय अक्रोड खाल्यामुळे मेंदूच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
शरीरात वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्यासाठी काजू खाण्याचा सल्ला दिला जातो. काजूमध्ये असलेले घटक शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नियमित ३ किंवा ४ काजू खावेत.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये आढळून येणारे फायबर शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात.
किमतीने महाग असलेले पिस्ता अनेक लोक खाणे टाळतात. पिस्त्यामध्ये असलेले घटक शरीरासाठी आवश्यक ठरतात. यामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी घटक असतात.
अळशीच्या बिया आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या बियांमध्ये असलेले गुणधर्म शरीरात वाढलेली प्युरीनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. अळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून नंतर तुम्ही सेवन करू शकता.