जगातील असे काही देश जिथे पुरुषांहून अधिक आहे महिलांची लोकसंख्या... जिथे पाहाल तिथे दिसतील फक्त महिलाच महिला
प्रत्येक देशाचे राहणीमन, कपडे, परंपरा या इतर देशांहून वेगळ्या असतात. त्याचबरोबर प्रत्येक देशाची लोकसंख्या देखील इतर देशांहून वेगळी असते
आपल्या भारतात पुरुषांची लोकसंख्या महिलांपेक्षा जास्त आहे मात्र देशात काही असे देश देखील आहेत जिथे महिलांची संख्या ही पुरुषांहून अधिक आहे
मोल्दोव्हा हा युरोपमधील एक देश आहे जिथे महिलांची लोकसंख्या ५३.९८% इतकी आहे. ही आकडेवारी वर्ल्ड अॅटलसच्या अहवालात देण्यात आली आहेय या देशाच्या जवळ रोमानिया आणि युक्रेन हे देश आहेत
अर्मेनिया हा पश्चिम आशिया आणि युरोपमधील कोकेशस प्रदेशातील एक पर्वतीय देश आहे. इथेही महिलांची लोकसंख्या पुरुषांहून जास्त आहे. कामाच्या निमित्ताने या देशातील बहुतेक पुरुष हे देशाबाहेर परदेशात राहतात. येथे महिलांची लोकसंख्या ५३.६१% एवढी आहे
रशिया देखील एक असा देश आहे जिथे महिलांची लोकसंख्या ही एकूण पुरुषांच्या लोकसंख्येहून अधिक आहे. इथे महिलांची लोकसंख्या ५३.५७% आहे. १९५० सालपासून रशियामध्ये महिलांची संख्या वाढू लागली.