मधुमेह असलेल्या रुग्णांनी 'हे' ड्रायफ्रुटस खाऊ नये
मनुका चवीला गोड असतात. यामध्ये नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. रक्तातील साखरेचे प्रमनवाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
जर्दाळूमध्ये नैसर्गिक साखरेचा गोडवा असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी जर्दाळू हे ड्रायफ्रूट खाऊ नये.
क्रॅनबेरीमध्ये नैसर्गिक साखर असते. नैसर्गिक साखर असलेल्या फळांमुळे झपाट्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. क्रॅनबेरी हे ड्रायफ्रूट मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी वाळवलेले आंबा हानिकारक ठरू शकतो. या आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. वाळलेला आंबा खाललने झपाट्याने रक्तातील साखर वाढू लागते.
अंजीरमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. चवीला गोड असलेले अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी अंजीरचे सेवन करू नये.