पावसाळयाच्या दिवसांमध्ये 'या' पदार्थांचे सेवन करू नये
पावसाळा चालू झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू नये. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया, बुरशी आणि अनेक कीटक झपाट्याने वाढू लागतात. अशी भाजी खाल्ल्याने पोटासंबंधित विकार होण्याची शक्यता असते.
मशरूम जमिनीमधून उगवतात. पावसाळ्यात व्हिटॅमिन-डी, आयर्न आणि व्हिटॅमिन-बी असलेले अन्नपदार्थ आरोग्यसाठी हानिकारक ठरतात. वातावरणातील आद्र्रतेमुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात.
पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर जलजीवांच्या पुनरुत्पादनाचा काळ सुरु होतो. त्यामुळे असे मासे खाल्ल्याने आरोग्य बिघडून जाते.समुद्राच्या पाण्यात अनेक जिवाणू आढळून येतात.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दही खाल्ल्यास सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. दही हा पदार्थ थंड असल्याने पावसाळ्यात दही खाणे टाळावे.
बाजारातून आणलेली फळे स्वच्छ धुवूनच खावी, अन्यथा अशीच फळे खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. बाजारात मिळणारे फळांचे रस प्यायल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.