घरातील या ठिकाणी TV लावल्यास होईल नुकसान! ताबडतोब जागा बदला अन्यथा डिव्हाईस होईल खराब
जर तुम्ही बाथरूमला लागून असलेल्या भिंतीवर किंवा त्याच्या अगदी जवळ टीव्ही ठेवला असेल, तर टिव्ही लवकर खराब होण्याची शक्यता आहे. बाथरूममध्ये दररोज आंघोळ केल्याने, त्या भिंतीच्या आत ओलावा पोहोचत राहतो. टीव्हीमध्ये खूप नाजूक इलेक्ट्रॉनिक भाग असतात, जे ओलाव्याच्या संपर्कात येताच खराब होऊ लागतात.
जरी तुम्ही स्वयंपाकघराजवळ टीव्ही ठेवला असेल तर यामुळे देखील टिव्ही लवकर खराब होऊ शकते. स्वयंपाक करताना, वाफ, तेलाचे बारीक थेंब आणि गरम हवा स्वयंपाकघरातून बाहेर पडत राहते. या गोष्टी हळूहळू टीव्हीवर पोहोचतात आणि स्क्रीनला चिकटू लागतात. तेलाचे हे थर स्क्रीनला नुकसान पोहोचवू शकतात.
जर तुम्ही टीव्ही बंद कॅबिनेट, कपाट किंवा लाकडी पेटीत ठेवला असेल तर तो टीव्हीसाठी धोकादायक ठरू शकतो. टीव्ही चालू असताना त्याच्या आतून उष्णता निर्माण होते आणि त्याला बाहेर पडण्यासाठी हवेची आवश्यकता असते. नाहीतर टिव्ही ओव्हरहीट होऊ शकते.
काही लोक टीव्ही अशा कोपऱ्यात ठेवतात जिथे कूलरमधून थेट हवा येते. कूलरमधून येणाऱ्या हवेत पाण्याचे लहान थेंब देखील असतात. जेव्हा ही ओलसर हवा थेट टीव्हीवर पडते तेव्हा ती हळूहळू टीव्हीमध्ये जाऊ लागते. यामुळे सर्किटमध्ये करंट पसरू शकतो.
टीव्ही खिडकी किंवा दाराजवळ ठेवू नये, अन्यथा धूळ आणि वारा त्यात सतत प्रवेश करत राहतो. जोरदार वाऱ्यासोबत येणारी धूळ टीव्हीच्या व्हेंटमध्ये जमा होते, ज्यामुळे तो लवकर गरम होऊ लागतो आणि खराब देखील होऊ शकतो.