Tech Tips: रेफ्रिजरेटरजवळ चुकूनही ठेऊ नका या वस्तू, नाहीतर कंप्रेसरवर होईल वाईट परिणाम!
अशा अनेक वस्तू आहेत ज्या फ्रिजच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. यामुळे आग लागणे किंवा ब्लास्ट होणे यासारख्या घटना घडू शकतात. अशाच काही वस्तूंबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या फ्रीजवळ ठेवणं धोकादायक आहे.
गॅस स्टोव्ह, मायक्रोवेव्ह, टोस्टर आणि इंडक्शन सारखी उपकरणे रेफ्रिजरेटरजवळ ठेवू नयेत. या गोष्टी रेफ्रिजरेटरच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात.
रेफ्रिजरेटरजवळ डिशवॉशर ठेवणे देखील धोकादायक ठरू शकतं. डिशवॉशर उष्णता आणि ओलावा निर्माण करतो, जो रेफ्रिजरेटरसाठी हानिकारक असू शकतो.
स्मार्टफोन किंवा लॅपटॉप रेफ्रिजरेटरजवळ ठेवल्याने रेडिएशनमुळे फ्रिजचे नुकसान होऊ शकते.
फ्रिज कधीही अशा ठिकाणी ठेवू नका जिथे थेट सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाशामुळे फ्रिजचा बाहेरील भाग गरम होतो आणि त्याचा कूलिंग सिस्टमवरही वाईट परिणाम होऊ शकतो.