खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
ब्लाऊज खांद्यांवरून खाली येत असेल तर ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजुने खांद्याच्या थोडस खाली बेल्ट लावून घ्यावा. यामुळे ब्लाऊज खांद्यावर व्यवस्थित बसेल.
ब्लाऊजला बेल्ट लावून घेतल्यानंतर त्याला छोटे गोंडे किंवा लटकन लावावेत. यामुळे साधा सिंपल ब्लाऊज आकर्षक आणि सुंदर दिसेल. ब्लाऊजला लावलेल्या नॉटमुळे फिटिंग व्यवस्थित बसेल.
घाईगडबडीच्या वेळी टेलरकडे जाऊन ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी ब्लाऊजच्या वरच्या आणि खालच्या हूकच्या खाचेमध्ये पिन लावावा. यामुळे ब्लाऊज परफेक्ट फिटिंग होईल.
ब्लाऊजला शिलाई मारताना खूप जास्त बारीक शिलाई मारू नये. मोठी शिलाई मारल्यामुळे धागे सहज काढता येतात. धागे काढताना ब्लाऊज खराब होणार नाही.
ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये बसण्यासाठी ब्लाऊज शिवायला देताना योग्य माप द्यावे. यामुळे ब्लाऊजची शिलाई खालीवर होत नाही.