हे उपाय केल्याने केसांना खाज नाही सुटणार (फोटो सौजन्य: iStock)
कधी कधी टाळूवर तेल, घाम, डँड्रफ किंवा माती जमा होण्यामुळे खाज सुटू शकते. नियमितपणे सौम्य शॅम्पू वापरून टाळू स्वच्छ ठेवा. कधीकधी, तेल लावून हलक्या हाताने मसाज करणे देखील उपयोगी ठरू शकते.
केसांना खाज सुटण्याची समस्या कमी करण्यासाठी कपूर किंवा मेंथॉल असलेले शॅम्पू किंवा ऑइल वापरा. यामुळे टाळूवर थंडावा मिळतो आणि खाज कमी होते.
नारळ तेल,, किंवा ऑलिव्ह ऑइल यासारखी नैसर्गिक तेलं टाळूवर लावून मसाज करा. हे तेल टाळूला हायड्रेट करतात आणि त्याच्या त्वचेला पोषण देतात, ज्यामुळे खाज कमी होऊ शकते.
टाळूच्या त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमितपणे डीप कंडिशनिंग करा. यामुळे खाज कमी होईल. अंडं, आवळा किंवा हनी आणि दही याचे मिश्रण कंडिशनर म्हणून वापरता येईल.
मानसिक ताण किंवा चिंता देखील कधी कधी खाज सुटण्याची कारण होऊ शकते. ध्यान, योग, किंवा चालायला जाणं हे ताण कमी करण्यासाठी उपयुक्त असू शकते.