दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुंदर डिझाईनची रांगोळी
दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. आणि देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध केला जातो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी रावण जाळला जातो. त्यामुळे तुम्ही अशी सुंदर रांगोळी काढू शकता.
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते. तसेच घरात पाटीवर खडूच्या साहाय्याने सरस्वती काढली जाते. रांगोळीमध्ये सुद्धा तुम्ही सरस्वती काढू शकता.
सणावाराच्या दिवसांमध्ये सगळीकडेच खूप जास्त घाई असते. घाईच्या वेळी नेमकी कशी रांगोळी काढावी बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही आपट्याचे पान काढून त्यात शुभ दसरा लिहू शकता.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही या सुंदर डिझाईनची देवीची रांगोळी काढू शकता. रांगोळी काढताना रंग म्हणून वेगवेगळ्या धान्यांचा सुद्धा वापर केला जातो.
कमीत कमी वेळात तुम्हाला रांगोळी काढ्याची असेल तर तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. मोठ्या जागेत फुलांची रांगोळी अतिशय सुंदर दिसते.