हे स्वस्त ड्राय फ्रुट्स खाल तर स्वस्थ राहाल. (फोटो सौजन्य - Social Media)
हृदयासाठी लाभदायक असलेला आणि ओमेगा-3 फॅटी एसिडने समृद्ध असलेला अक्रोड हिवाळ्यात उर्जा आणि उबदारपणा देतो. थंड वातावरणामध्ये याचे सेवन करणे फार फायद्याचे ठरते.
प्रोटीन, फायबर, आणि व्हिटॅमिन ईने परिपूर्ण बदाम हिवाळ्यात चांगले आरोग्य आणि त्वचेसाठी उपयुक्त असते. स्किन केअर बद्दल जास्त संवेदनशीला लोकांनी बदाम नक्कीच खावे.
मॅग्नेशियम आणि लोहाने समृद्ध असलेले काजू हाडांची ताकद वाढवते व हिवाळ्यातील उबदारपणा कायम ठेवते.
अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि फायबर युक्त पिस्ता हिवाळ्यात शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. थंडीच्या दिवसात पिस्ता खाणे फार फायद्याचे ठरते.
खजूरमध्ये नैसर्गिक शर्करा असते. तसेच खजूरमध्ये असलेले आयरन उबदारता आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.