गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या गर्भाशयात बाळाचा सगळ्यात पहिला आणि शेवटचा कोणता अवयव तयार होतो?
गर्भधारणेच्या पहिल्या टप्प्यात बाळाचा अतिशय नाजूक नाजूक अवयव तयार होतात. त्यातील पहिला अवयव म्हणजे न्यूरल ट्यूब. या ट्यूबमध्ये सगळ्यात आधी बाळाच्या पाठीचा कणा आणि मेंदू तयार होतो.
दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात हळूहळू बाळाचे कान, हात-पाय, रक्तपेशी तयार होऊन रक्तभिसरण होते. त्यानंतर अन्ननलिका आणि हाडांचा विकास होण्यास सुरुवात होते.
तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत बाळाचे हृदय, यकृत, मूत्रमार्ग आणि नसा कार्य करू लागतात. त्यानंतर पाचव्या महिन्यात बाळाचे दात आणि हाडे मजबूत होतात.
सहाव्या आणि सातव्या महिन्यात बाळाच्या शरीरातील नसा कार्य करू लागतात. तसेच बाळाची श्रवणशक्ती सुधारते. आठवा महिना लागल्यानंतर बाळ आईच्या गर्भात हालचाल करू लागते.
गर्भधारणेचा शेवटचा टप्पा म्हणजे नववा महिना. या महिन्यात बाळाच्या पापण्या हळूहळू हालचाल करतात. याशिवाय बाळाच्या शरीरातील फुफ्फुसे तयार होतात. नऊ महिने पूर्ण होण्याच्या आधी पचनक्रिया विकसित होते. पचनक्रिया हा बाळाचा शरीरातील सगळ्यात शेवटचा अवयव आईच्या गर्भात तयार होतो.