AI ईमेज ओळखणं झालंय कठीण! 'या' सोप्या टीप्स तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर (फोटो सौजन्य - pinterest)
कोणतेही चित्र बारकाईने पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ती AI इमेज आहे की खरी. AI इमेज ओळखण्यासाठी तुम्ही काही सोप्या टीप्सचा वापर करू शकता.
आपण कोणत्याही व्यक्तीचा फोटो पाहिल्यास, त्याचा चेहरा आणि केस काळजीपूर्वक पहा. तुम्हाला फरक समजेल आणि या आधारावर तुम्ही हे ठरवू शकाल की तो फोटो AI ने तयार केला आहे की नाही.
फोटोमध्ये काही लिहिले असेल तर त्याकडे लक्ष द्या. AI साधनांद्वारे तयार केलेल्या प्रतिमांमध्ये मजकूर विखुरलेला असतो.
AI वाक्ये तयार करताना चुका करतात.
तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही AI फोटो अगदी सहज ओळखू शकता.
फोटोच्या सावल्या आणि प्रकाश काळजीपूर्वक पाहून तुम्ही AI फोटो ओळखू शकता.