गर्भधारणेदरम्यान दही खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य - Social Media)
दह्यामध्ये "लॅक्टोबॅसिलस" सारखे चांगले जीवाणू असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि अपचन, गॅस यांसारख्या तक्रारी कमी करतात.
दह्यातील प्रोबायोटिक्स आणि प्रथिने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, जे गर्भवती स्त्रीला संसर्गापासून संरक्षण देतात.
नियमित दही सेवन केल्यास गर्भातील बाळाला भविष्यात अॅलर्जी होण्याचा धोका कमी होतो, असे काही संशोधनांमधून आढळून आले आहे.
गेस्टेशनल डायबेटिसचा धोका कमी करते. दह्यामधील पौष्टिक तत्त्वे आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने गरोदरपणात मधुमेह होण्याचा धोका घटतो.
हाडे आणि दात मजबूत करते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D असते, जे गर्भवती स्त्रीचे आणि गर्भातील बाळाचे हाड व दात मजबूत करण्यास मदत करते.