ऑनलाईन छळाविरुद्ध आवाज उठवण्याचं फरहान अख्तरचं आवाहन
ऑनलाईन छळाविरुद्ध आवाज उठवा, असं आवाहन अभिनेता फरहान अख्तरनं केलं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोणत्या टूल्सचा वापर करुन आपण ऑनलाईन त्रास देणाऱ्यांबद्दल तक्रार करु शकतो, हे सांगणारा व्हिडिओ फरहान अख्तरनं (Farhan Akhtar Video) शेअर केला आहे.