
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Shanawas Death: प्रसिद्ध मल्याळम अभिनेते शानवास यांचे निधन; वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चित्रपटाच्या टीझरमध्ये काय दाखवण्यात आले?
चित्रपटाच्या टीझरमध्ये १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धादरम्यान १८ नोव्हेंबर रोजी काय घडले ते दाखवण्यात आले आहे. टीझरच्या सुरुवातीला चीनने भारतावर हल्ला करण्याची संपूर्ण योजना आखल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच, भारतातील १२० शूर सैनिक पूर्णपणे तयार दिसत आहे. मेजर शैतान सिंगच्या भूमिकेत फरहान अख्तर म्हणतो, ‘हा गणवेश केवळ धैर्याचीच नाही तर त्यागाचीही मागणी करतो. आम्ही मागे हटणार नाही.’ यानंतर, भारतीय सैनिक चीनच्या हल्ल्यांना योग्य उत्तर देतात आणि त्यांच्या देशासाठी लढतात.
चित्रपटाच्या कथेबद्दल
‘१२० बहादूर’ ही शौर्याची कहाणी आहे, जी १९६२ च्या भारत-चीन युद्धात रेजांगला आघाडीवर लिहिली गेली होती. केवळ १२० भारतीय सैनिकांनी हजारो चिनी सैनिकांविरुद्ध शौर्याने लढले आणि आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण केले. मेजर शैतान सिंग भाटी यांच्या नेतृत्वाखाली लढलेली ही लढाई अजूनही भारतीय सैन्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाते.
वयाच्या सत्तरीत हृतिकच्या आईने ‘War २’ च्या गाण्यावर केला डान्स, Viral Video ने केले चाहत्यांना चकीत
लडाखच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये केली शूटिंग
हा चित्रपट वास्तववादी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, लडाखच्या उंच टेकड्यांवर याचे चित्रीकरण करण्यात आले आहे, जिथे ऑक्सिजनची कमतरता आणि तापमान शून्यापर्यंत पोहोचणे सामान्य आहे. चित्रपटाचा बराचसा भाग १४,००० फूट उंचीवर -१० अंश सेल्सिअस तापमानात चित्रित करण्यात आला आहे.