महावस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणी साडीवर शोभून दिसतील 'या' डिझाईनचे सुंदर ब्लाऊज
अंगावर नेसलेल्या महागड्या पैठणी साडीमध्ये महिलांचा लुक अतिशय रुबाबदार आणि रॉयल दिसतो. पैठणी साडीचे अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत. काहींना साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे जर तुमच्याकडे लाल किंवा गुलाबी रंगाची पैठणी साडी असेल तर त्यावर तुम्ही हिरव्या रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज परिधान करू शकता.
उठावदार पैठणी साडीवर काहींना सुंदर सुंदर बुट्या असलेले ब्लाऊज परिधान करायला खूप जास्त आवडतात. साडीच्या आतील ब्लाऊज आणि इतर कापडाचा वापर करून शिवलेले ब्लाऊज अतिशय सुंदर दिसते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिलांना बऱ्याचदा ब्लाऊजवरील डिझाईन शोधायला वेळ मिळत नाही. अशावेळी खूप सिंपल डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या डिझाईनचे ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतात.
पैठणी साडीच्या पदराला ब्लाऊज दिलेला असतो. त्यामुळे पैठणी साडीच्या डिझाईनचा ब्लाऊज शिवून तुम्ही त्यावर सुंदर सुंदर नक्षीकाम करू शकता.
काहींना अतिशय फिकट आणि साधी सिंपल डिझाईन असलेली साडी परिधान करायला खूप जास्त आवडते. साडीच्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही स्टायलिश दिसाल.