Actor Dhairya Gholap Won Filmfare Award Marathi 2025
"अथांग" आणि "येक नंबर" या दोन प्रोजेक्टमधून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या अभिनेता धैर्य घोलपच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बातमी आहे. अभिनेत्याने "अथांग" वेबसीरीजमधून रुपेरी पडद्यावर आणि "येक नंबर" चित्रपटातून रुपेरी पडद्यावर डेब्यू केले आहे.
रुपेरी पडद्यावर डेब्यू केलेल्या "येक नंबर" चित्रपटासाठीच अभिनेता धैर्य घोलप याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. "येक नंबर" चित्रपटातून धैर्यने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि फिल्मफेअर मराठी २०२५ मध्ये त्याने बेस्ट डेब्यू पुरस्कार पटकावला.
अभिनयाची जिद्द आवड आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला त्याचा एक नंबर परफॉर्मन्स सगळचं काही तो जिंकून गेला अस म्हणायला हरकत नाही. पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी धैर्यला हा खास पुरस्कार मिळाला असून त्याने सोशल मीडिया वर खास पोस्ट लिहिली आहे.
धैर्य म्हणतो " मी अत्यंत कृतज्ञ आणि जवाबदारीच्या भावनेतून हा पुरस्कार स्वीकारला आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम माझ्यासोबत होती आणि म्हणून मी प्रताप सारखी भूमिका साकारू शकलो. एक नंबर टीम आणि एक नंबर सिनेमा बनवणाऱ्या माझ्या सगळ्या एक नंबर माणसांना धन्यवाद ! "
एवढं नाही तर अभिनेत्याने या पुरस्काराच श्रेय चक्क मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना सुद्धा दिलं आहे. एक नंबर भूमिका साकारणारा धैर्य हा येणाऱ्या काळात अनेक वैविध्यपूर्ण भूमिका मधून दिसणार असल्याचं देखील कळतंय !