Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘जब्राट’ हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच सशक्त संदेश देतो आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहे. लवकरच तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 10, 2026 | 05:43 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मनोरंजनाबरोबरच सशक्त आशयाची सांगड घालत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती मराठी निर्माते-दिग्दर्शक सातत्याने प्रेक्षकांसमोर आणत असतात.मराठी चित्रपटसृष्टीत अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या प्रगती कोळगे यांनी दमदार पाऊल टाकले आहे. त्यांनी ‘जब्राट’ या चित्रपटाचे निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.प्रगती कोळगेची खासियत म्हणजे, परदेशात राहूनही त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि मातीशी असलेली नाळ कायम जपली आहे. ‘जब्राट’ हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच सशक्त संदेश देतो आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहे. येत्या २० फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘जब्राट’ हा चित्रपट आजच्या तरुणाईची कथा मांडतो. बेधुंदपणे जगत असताना समोर उभ्या असणाऱ्या प्रश्नांना तितक्याच सक्षमपणे सामोरं जाणाऱ्या तरुणाईचा दृष्टिकोन या चित्रपटात पहायला मिळतो. ‘जब्राट’ संगीतमय आणि रंगतदार चित्रपट असून मैत्रीच्या भावविश्वाला स्पर्श करणारी सशक्त कथा यात मांडण्यात आली आहे.

दिग्दर्शिका प्रगती कोळगे सांगतात की, ‘तुम्ही जर उत्तम देण्याचा प्रयत्न केलात तर त्याला प्रतिसाद ही उत्तमच मिळतो. या विश्वासानेच ‘पल्याडवासी’ या चित्रपटानंतर ‘जब्राट’ माझा हा सिनेनिर्मितीचा दुसरा प्रयत्न आहे. ‘जब्राट’ चे कथानक सादर करण्यासाठी फ्रेश चेहऱ्यांची गरज होती. त्यामुळे ऑडिशन्सच्या माध्यमातून नवे चेहरे आम्ही आणले असून त्यांना अनेक नामवंत आणि अनुभवी कलाकारांची साथ लाभली आहे. लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स असा मनोरंजनाचा भरपूर मसाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आजच्या काळात कसे जगायचे हे सांगणारा हा सिनेमा असल्याने प्रत्येकाने जरूर पाहावा असे आवाहनही प्रगती कोळगे यांनी केले आहे.

मराठी चित्रपट ‘जब्राट’ मध्ये आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट आणि प्रगती कोळगे या नव्या चेहऱ्यांसह संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांसारख्या अनुभवी कलाकारांचा समावेश आहे.

‘तेरे नाम’च्या री-रिलीजआधी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; यशाचं श्रेय स्वतःला न घेता कथेला दिलं महत्त्व
चित्रपटाचे निर्माता आहेत अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर संगीत डॉ. जयभीम शिंदे यांनी दिले आहे. सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स आहेत, तर वेशभूषा युगेशा ओमकार यांनी केली आहे.निर्माता-दिग्दर्शक प्रगती कोळगे यांनी सांगितले की, प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणे आणि त्यांना काहीतरी वेगळे अनुभवायला मिळावे यासाठी हा चित्रपट तयार केला आहे. त्यांना विश्वास आहे की ‘जब्राट’ प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवेल.

३०,००० लोकांच्या गर्दीत हरवलं मुलं, Sonu Nigamने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केलं असं काही की चकीत झाले चाहते; पाहा Video

Web Title: Connecting marathi culture from the usa jabraat set to release soon audience excitement at its peak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Marathi Cinema: बॉलीवूडला सोडून मराठीत पदार्पण! अभिषेक कंवरचा ‘जनक’ 19 दिवसांत पूर्ण
1

Marathi Cinema: बॉलीवूडला सोडून मराठीत पदार्पण! अभिषेक कंवरचा ‘जनक’ 19 दिवसांत पूर्ण

Tighee Movie: ‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, आई-मुलीच्या नात्याला ‘तिघी’ची भावनिक किनार; सोनाली कुलकर्णी म्हणाली…
2

Tighee Movie: ‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, आई-मुलीच्या नात्याला ‘तिघी’ची भावनिक किनार; सोनाली कुलकर्णी म्हणाली…

Dharmendra यांना मिळणार मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार, हेमामालिनी स्वीकार करणार; सनी – बॉबीला आहे माहिती
3

Dharmendra यांना मिळणार मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार, हेमामालिनी स्वीकार करणार; सनी – बॉबीला आहे माहिती

हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, Kangna Ranaut ने गुपचुप उरकलं लग्न? नवरा मुलगा आहे तरी कोण ?
4

हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, Kangna Ranaut ने गुपचुप उरकलं लग्न? नवरा मुलगा आहे तरी कोण ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.