फटाक्यामुळे प्रदूषित झालेल्या वातावरणात बाहेर फिरताना द्या 'या' गोष्टींकडे लक्ष (फोटो सौजन्य: iStock)
दिवाळीत फटाक्यांमुळे हवा प्रदूषित होते. याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो म्हणूनच तुम्ही तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ ठेवा. त्वचेवर खोबरेल तेल आणि चांगली मॉइश्चरायझर क्रीम लावा.
जेव्हा केव्हा घराबाहेर जाल तेव्हा स्वतःचा चेहरा कव्हर करून बाहेर निघा. यामुळे बाहेरील विषारी वायू तुमच्या चेहऱ्याला हानी पोहचवणार नाही.
तुमच्या स्किनला सदैव हायड्रेट ठेवण्यासाठी नेहमी पाणी पित चला. यामुळे फक्त तुम्ही हायड्रेट राहणार नाही तर तुमची स्किन सुद्धा ताजीतवानी दिसेल.
अनेकदा वातावरण प्रदूषित झाल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणूनच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करा.
दिवाळीच्या पुढील काही दिवस मास्क घालून फिरत चला. यामुळे विषारी वायू तुमच्या नाकावाटे शरीरात जाणार नाही. तसेच आरोग्यासंबंधित समस्या असल्यास डॉक्टरांना पहिले कळवा.