नीता अंबानीपासून दिग्गज अभिनेत्रींपर्यंत आवडता ठरतोय पाचू
पाचू हा रत्न जगभरातील प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो. जगभरातील करोडपती व्यक्तींच्या दागिन्यांमध्ये पाचू दागिने प्रामुख्याने पाहायला मिळतात. हा रत्न हिरव्या खनिज बेरीलपासून बनवला जातो. यामध्ये क्रोमियम आणि व्हॅनेडियम इत्यादी घटक आढळून येतात. हा नैसर्गिक हिरवा रंग कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर उठावदार आणि सुंदर दिसतो.
पाचू रत्न निष्ठा, नवीन सुरुवात, शांती आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. पाचू रत्नांचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. इ.स.पूर्व ३०० इजिप्तमध्ये खाणकाम सुरू होते. दरम्यान, कोलंबियाच्या मुझो जमातीकडे जगातील सर्वोत्तम पाचूच्या खाणी होत्या, ज्या शोधण्यासाठी स्पॅनिश संशोधकांना २० वर्षे लागली.
भारतीय उपखंडात, मुघल काळात पाचूंना विशेष महत्व होते. जांच्या तलवारींच्या टोकांपासून ते पगड्या आणि आकर्षक नेकलेससुद्धा पाचू रत्नापासून बनवले जायचे. युरोपमध्ये, मध्ययुग, पुनर्जागरण आणि व्हिक्टोरियन काळात पाचूचे दागिने विशेष लोकप्रिय होते.
भारतीय जगभरातील सेलिब्रिटी आणि संग्राहकांना पाचू रत्न खूप जास्त आवडते. एलिझाबेथ टेलरचा ब्वल्गारी पाचू हार आणि नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या पाचू रत्नाची जगभरात चर्चा पाहायला मिळते.
फॅशन आणि डिझाइनच्या जगात एमराल्ड ग्रीन हा एक सिग्नेचर शेड मानला जातो. एमराल्ड ग्रीन रंग फॅशनच्या दृष्टिकोनातून खूपच वेगळा आहे. फारो, मुघल सम्राट आणि युरोपीय सम्राज्ञींनी पाचू रत्नाला खूप जास्त पसंती दर्शवली आहे.