पेठ्यापासून ते दम बिर्याणीपर्यंत भारताच्या या पदार्थांचा इतिहास आहे फार रंजक
पेठा - आग्र्याच्या पेठाचा शोध मुघल साम्राज्यात ताजमहालच्या बांधकामाशी जोडला गेला आहे. ताजमहलच्या कामगारांना तेच तेच डाळ चपातीचं जेवण दिलं जात होत. अशात कामगारांसाठी पेठ्याची रेसिपी तयार करण्यात आली होती.
दम बिर्याणी - सर्वांच्या आवडीची दम बिर्याणीची उत्पत्ती हैदराबादच्या संस्थानात झाली. मध्ययुगीन काळात तैमूरच्या भारतावरील आक्रमणादरम्यान बिर्याणीची सुरुवात झाली. बिर्याणीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार अन्नटंचाई होती, तेव्हा अवधच्या नवाबाने त्याच्या प्रदेशातील सर्व गरीब लोकांसाठी मोठ्या भांड्यांमध्ये अन्न शिजवण्याचा आदेश दिला. स्वयंपाकाच्या या तंत्राला 'दम' म्हणून ओळखले जाऊ लागले.
डाल बाटी - राजस्थानचा फेमस आणि पारंपारिक पदार्थ डाल बाटीचा शोध मेवाडच्या चित्तोडगड किल्ल्यात लागला होता. युद्धादरम्यान टिकून राहण्यासाठी मेवाडच्या राजपूत राजांना हा पदार्थ दिला जात होता.
मैसूर पाक - हा दक्षिण भारतातील एक लोकप्रिय गोडाचा पदार्थ आहे. २० व्या शतकात याला म्हैसूर पॅलेसच्या स्वयंपाकघरात तयार करण्यात आले. त्यावेळी नलवाडी कृष्णराज वोडेयार राजा सत्तेवर होते. त्यांना खुश करण्यासाठी स्वयंपाकी काकासुर मडप्पा राजाला रोज नवनवीन पदार्थ तयार करुन खायला देत असे. एके दिवशी त्याने मैसूर पाकची रेसिपी ट्राय केली, जी राजाला प्रचंड आवडली.
जिलेबी - भारताचा लोकप्रिय गोडाचा पदार्थ जिलेबीची उत्पत्ती पश्चिम आशियात झाली. मध्ययुगीन काळात पर्शियन भाषिक आक्रमकांनी जलेबी भारतात आणली. १५ व्या शतकात भारतात या गोड पदार्थाला 'कुंडलिका' आणि 'जलावल्लिका' असे म्हटले जात असे.