Ganesh Chaturthi २०२४: मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष, पहा मुंबईतील गणपतींचे खास फोटो (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात मोठं आकर्षण मानलं जातं. या राजाचं दर्शन घेणं म्हणजे रात्रभर लाईनमध्ये उभं राहणं. मात्र या मूर्तीची गोष्टच वेगळी आहे
मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक म्हणून चिंतामणी गणेशोत्सव मंडळाला ओळखले जाते. यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 105 वे वर्ष आहे.
तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती कायमच देखणेपणासाठी, उंचीसाठी गणेशभक्तांचा आकर्षणाचा विषय ठरते.
गणेशगल्ली किंवा मुंबईच्या राजाची खासियत म्हणजे २२ फुटांची आकर्षक मूर्ती.
ठाण्याच्या राज्याची दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांचा जनसागर उसळला आहे.
मुलूंडचा श्री खूप प्रसिद्ध असून येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते.