
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया डिसुझा (Genelia D’Souza ) ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असते.
नवीन प्रोजेक्ट, नवीन फोटो शूट, रील्स तसेच कुटुंबा सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळत आहे.
जिनिलिया डिसुझा हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एका सुंदर ड्रेस मधील फोटो पोस्ट केला आहे. यात जेनेलिया अगदी सुंदर दिसत असून जणू परी सारखीच दिसत आहे.
जिनिलिया ही अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ची पत्नी असून दोघेही बॉलिवूड मधील मोस्ट आयडियल कपल म्हणून ओळखले जातात.
जिनिलिया हिने तिच्या करिअरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटातून केली होती. ती लवकरच रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड ‘ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.