800 वर्षे जुनं असं एक गाव जिथे एकही रस्ता नाही! कसा होतो लोकांचा प्रवास?
तुम्ही अशा गावाची कल्पना करू शकता का जिथे एकही रस्ता नाही, गाड्यांचा आवाज नाही? कल्पना करणं अवघड होत असलं तरी असं गाव प्रत्यक्षात आहे, जिथे आजपर्यंत एकही रस्ता बनलेला नाही.
गावात किंवा शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी रस्ते आवश्यक असतात. पण असं एक गाव जिथे एकही रस्ता नाही. हे एखाद्या चित्रपटातील दृश्य असल्यासारखं वाटते.
नेदरलँडमधील गिथुर्न गावाबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे जगातील सर्वात अनोखे गाव आहे. ज्याला नेदरलँडचे व्हेनिस असेही म्हणतात.
या ठिकाणी कार आणि बाईकचा आवाज नाही, इथे प्रत्येक घर कालव्याच्या काठावर बांधलेले आहे आणि ये-जा करण्यासाठी बोटी वापरल्या जातात. या गावाचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
याला अतिशय शांत गाव असेही म्हणतात. वास्तविक हे गाव पाण्यावर वसलेले आहे. जिथे सगळीकडे पाणीच पाणी. अशा परिस्थितीत एखाद्याला गावात कुठेतरी जावे लागते तेव्हा त्याला बोटीचा आधार घ्यावा लागतो.
गावात काही ठिकाणी लाकडी पूल बांधण्यात आले आहेत. ज्यातून कालवे ओलांडता येतात. या गावाची स्थापना 1230 मध्ये झाली आणि सुरुवातीला या गावाचे नाव गेटनहॉर्न होते. जगभरातून अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. हे गाव 800 वर्षे जुने असून पूर्णपणे पाण्यावर वसलेले आहे. या गावात ना रस्ते आहेत ना कोणाकडे कार किंवा दुचाकी आहे.