'तिची फक्त एक स्माईलच पुरेशी...!' राणी मुखर्जीचा हा फोटोशूट पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
@ranimukherjeeeofficial या इंस्टाग्राम हॅण्डलवर अभिनेत्री राणी मुखर्जीचा नवा फोटोशूट शेअर केला आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर फार गाजत देखील आहेत.
राणी नेहमीच भारतीय पोशाखात दिसून येते. या फोटोमध्ये राणीने सुंदर साडी परिधान केले आहे. साडीची जरी सुवर्ण रंगाची असल्याने पाहणाऱ्याला आकर्षित करत आहे.
या छायचित्रांमधील सर्वात आकर्षक बाब म्हणजे राणीचे गोड हसणे. तिची हटके स्माईल आताही आरामात लावेल असंख्य तरुणांची लाईनच लाईन.
राणी मुखर्जीने गळ्यात सुंदर हार परिधान केला आहे. कॅप्शनमध्ये फक्त तीन हार्ट ईमोजी टाकण्यात आले आहे.
या पोस्टखाली कौतुकांनी प्रतिसादाचा वर्षाव केला आहे. अनेक नेटकरी राणीच्या या रूपाने घायाळ तर झालेच आहेत तसेच भरभरून कौतुकही केले आहे.