भारतीय स्वयंपाक घरात आवर्जून वेलची हा पदार्थ सापडतो. गोड पदार्थ बनवताना, चहा किंवा इतर पदार्थांमध्ये टाकण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. वेलची हा पदार्थ औषधी असल्याने सर्वच घरांमध्ये आढळून येतो. सकाळी उठल्यानंतर वेलची पावडर टाकून दूध प्यायल्यास स्मरणशक्ती वाढून आरोग्य सुधारते. निरोगी आरोग्यासाठी वेलचीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. वेलचीमध्ये पोटॅशियम , कॅल्शियम, मॅग्निशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स आढळून येतात. वेलची खाल्याने एंजाइम्सचे सिकरिशन स्टिम्यूलेट होते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. आज आम्ही तुम्हाला किचनमध्ये असलेल्या इवलुश्या वेलचीचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
रोज सकाळी एक वेलची चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. तसेच वेलचीचे सेवन केल्याने तोंडातील दुर्गंधी निघून जाते.
वेलचीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी वेलची प्रभावी आहे. एका ग्लास दुधात एक चिमूटभर वेलची पावडर टाकून मुलांना प्यायल्या दिल्याने त्यांची स्मरणशक्ती सुधारते.
सकाळी उठल्यानंतर एक वेलची चावून खाल्ल्यानंतर त्यावर एक ग्लास पाणी प्यायल्यास केस गळतीची समस्या दूर होते. वेलचीमुळे शरीरातील सर्व नसांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते.
चहा किंवा इतर गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो.
शरीरातील रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेलची फायदेशीर आहे. वेलचीमध्ये पोटॅशियम आणि फायबर असते ज्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.