मका खाण्याचे आरोग्यदायी फायदे
मक्याचे दाणे खाल्ल्याने शरीराला जीवनसत्वे आणि प्रोटीन मिळते. ज्या व्यक्तींच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल अशांनी सकाळी उठल्यानंतर उकडलेले मक्याचे दाणे खावे.
मक्याच्या दाण्यांपासून भाजी, भजी, पराठा, चीझ कॉर्न, भाजलेले मक्याचे दाणे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मक्याचे दाणे फायदेशीर आहेत. जर तुम्हाला सतत भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मक्याच्या दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मक्याचे दाणे प्रभावी आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगराई वाढू लागते, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात मक्याच्या दाण्यांचे सेवन करावे.
मक्याचे दाणे खाल्ल्याने शरीराला प्रोटीन, जीवनसत्वे, मॅग्निशियम, लोह इत्यादी अनेक पोषक घटक मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात मक्याचे सेवन करावे.