पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'ही' ड्रिंक प्या
काकडी पुदिन्याचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स राहते. शरीरामध्ये साचलेली घाण, अतिरिक्त चरबी कमी करण्याचे काम काकडी पुदिना डिटॉक्स वॉटर करते.
मेथीमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
कोरफडचा रस सकाळी उठल्यानंतर नियमित प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोरफडीचा रस प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास होते.
गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यानंतर पोटावरील अतिरिक्त चरबी जळून जाते. यामुळे बॉडी डिटॉक्स होऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
ग्रीन टी चे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन वाढलेले वजन कमी होते. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर नियमित ग्रीन टी चे सेवन करावे.