फोटो सौजन्य- International Chess सोशल मीडिया
भारताच्या ओपन संघाने सुरुवातीपासून स्पर्धेमध्ये आपली पकड बनवून ठेवली होती, संघाला फक्त कझागिस्तान संघाविरुद्ध सामना ड्रॉ झाला त्यानंतर १० राउंडमध्ये संघाने दमदार विजय मिळवला आहे. फोटो सौजन्य- International Chess सोशल मीडिया
भारतीय महिला संघाने सुरुवातीपासून पकड बनवून ठेवली होती परंतु संघाला दहाव्या राउंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु ११ व्या राउंडमध्ये कमाल करून संघाने सुवर्ण पदक नावावर केलं. फोटो सौजन्य- International Chess सोशल मीडिया
भारताच्या ओपन संघाने कमालीची कामगिरी करत चेस ऑलिम्पियाड २०२४ च्या अकराव्या राउंडमध्ये कमालीची कामगिरी करून स्लोवोनियाला ३.५-०.५ ने पराभूत केलं. फोटो सौजन्य- International Chess सोशल मीडिया
भारताचा स्टार युवा चेस खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर डी गुकेशने स्पर्धेमध्ये एकही खेळ गमावला नाही, त्याचबरोबर ऑलिम्पियाड चेस मध्ये त्याने वैयक्तिक मेडल देखील नावावर केलं आहे. फोटो सौजन्य- Chessbase India सोशल मीडिया
महिला संघाची सर्वात युवा खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखने वैयत्तिक गोल्ड मेडल नावावर केलं आहे, तिने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. फोटो सौजन्य- Chessbase India सोशल मीडिया
चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये भारताच्या ओपन संघाने आणि महिला संघाने दमदार कामगिरी करून भारतासाठी डबल गोल्ड मेडल नावावर केलं आहे. फोटो सौजन्य- International Chess सोशल मीडिया
भारताचे दिग्गज चेस खेळाडू आणि पाच वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथ आनंद हे सुद्धा मेडल सेरेमनी मध्ये सहभागी झाले होते. फोटो सौजन्य- International Chess सोशल मीडिया