हिमांश कोहलीने शेअर केले लग्नाचे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेता हिमांश कोहलीने विन्नी कोहलीसोबत दिल्लीतील एका मंदिरात खाजगी समारंभात लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर फार वायरल होत आहेत.
मुळात, हिमांश आणि विन्नीच्या या समारंभात फक्त कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. याच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.
हिमांशने आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंस्टग्रामवर या फोटोज ला फार बघितले जात आहे. नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या फोटोंमध्ये दोघे पति पत्नी फार आनंदित दिसत आहे. एका फोटोमध्ये तो पत्नीच्या कपाळावर किस करताना दिसत आहे.
अभिनेता तुषार कपूरने या नवविवाहित दांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत, कारण तो हिमांशचा जवळचा मित्र आहे.