मेष रास :अग्नी तत्वाची रास असल्याने या राशीचा आईचा स्वभाव काहीसा रागीट असतो. मुलांना शिस्त लावण्यासाठी ती कायमच तत्पर असते.
वृषभ रास :मुलांना खाऊ घालण्यात या आईता विशेष समाधान वाटतं. वृषभ राशीच्या आईच्या हाताला उत्तम चव असते.
मिथुन रास :मिथुन राशीची आई एक हाती अनेक काम करते. मुलांचा डब्बा, शाळेत सोडणं हे सगळं ती एकाच वेळी करते.
कर्क रास:कर्क राशीची आई आपल्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधण्यास प्राधान्य देते.
सिंह रास :सिंह राशीची आई मुलांना पुढे जाण्यास कायम प्रोत्साहन देते.
कन्या रास : मुलं आजारी पडू नयेत याची ती कायमच काळजी घेते.
तूळ रास :तूळ राशीच्या आईला आपल्या मुलांना घेऊन बाहेर फिरायला घेऊन जाणं आवडतं.
वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या आईला मुलं घाबरतात. ती जेवढी प्रेमळ असते तितकीच रागीटही असते.
धनू रास: धनु राशीच्या आईला प्रवासाची आवड असते त्यामुळे ती नेहमीच मुलांना सहलीसाठी परवानगी देते.
कुंभ रास : कुंभ राशीची आई पारंपरिक विचारांपेक्षा आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारी असते.
मकर रास: मकर राशीच्या आईला आपली मुलं आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं असं वाटतं.
मीन रास : मीन राशीची आई अत्यंत भावनिक असते. मुलांनी काही दुखावलं तर तिला लगेच जाणवतं.