तुमचे सोन्याने दागिने खोटे तर नाहीत? 2 मिनिटांत सत्य होईल उघड; ही आहे प्रोसेस
सोन्याचे दागिने खरेदी करताना नेहमी हॉलमार्क तपासणे अनिवार्य आहे. सोन्याच्या दागिन्यांवर BIS द्वारे प्रमाणित हॉलमार्क दिलेला असतो. याच्या मदतीने सोने किती कॅरेटचे आहे ते आपल्याला समजते.
लक्षात ठेवा, बनावटी सोनं किंवा चांदी ही चुंबकाकडे खेचली जाते, ज्यामुळे तुम्ही कधीही सोनं खरेदी करायला जाल तेव्हा तुमच्यासोबत एक चुंबक सोबत ठेवायला विसरु नका.
सोन्याला नायट्रिक ॲसिडमध्ये भिजवून ठेवा आणि काहीवेळ प्रतिक्षा करा. जर पाण्याचा रंग बदलला तर तुम्ही खरेदी केलेलं सोनं बनावटी असल्याची शक्यता आहे.
सोनं तपासण्याचा आणखीन एक सोपा मार्ग म्हणजे याला पाण्यात बूडवून पाहा. जर तुमचे सोने पाण्यात टाकताच बुडले तर ते खरे असण्याची शक्यता आहे पण जर ते पाण्याच्या वर तरंगत असेल तर ते बनावटी असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
सोन्याची तपासणी करण्यासाठी तुम्ही साऊंट टेस्टिंगचाही पर्याय निवडू शकता. खरे सोने किंवा चांदी घंटासारखा आवाज निर्माण करते, तर बनावट धातूंमध्ये सामान्यतः जड, पोकळ आवाज येतो.
हा लेख सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.