नेतृत्व कसे असावे? जाणून घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)
जर आपल्यात नेतृत्व कौशल्य विकसित करायचे आहेत तर स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि आत्मचैतन्य निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्यातील सामर्थ्य आणि कमकुवतपणा ओळखून त्यावर काम करणे आवश्यक आहे.
संवाद फार महत्वाचा आहे. संघासोबत प्रभावी संवाद साधणे आवश्यक आहे. संवाद नेहमी खुला आणि स्पष्ट असावा. टीम सदस्यांचे विचार ऐका आणि त्यांना प्रोत्साहन द्या.
कामाचे योग्य विभाजन करा. आपल्या संघाच्या सदस्यावर विश्वास ठेवा. पण विश्वास ठेवण्यागोदर खात्री करून घ्या. इतरांना जबाबदाऱ्या देऊन त्यांचा विकास करा. आवश्यक तेव्हा सहाय्य मागण्याची तयारी ठेवा.
नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमत्वामध्ये समस्या सोडवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता असणे गरजेचे असते. परिस्थितीचे योग्य विश्लेषण करा आणि त्यानुसार निर्णय घ्या.
स्वतःही प्रेरित राहा आणि इतरांना प्रेरित करा. इतरांच्या आधी तुमचा उत्साह शिघेला ठेवा. टीमचे सदस्य प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन देणारे शब्द वापरा.आपण नेतृत्व करत आहोत म्हणजे आपण सगळ्यात हुशार आहोत असे नसते. आपल्यालाही शिक्षणाची तेवढीच गरज असते जेवढी इतर सदस्यांना असते. त्यामुळे जितके होईल तितके ज्ञान प्राप्त करत चला. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी तयार रहा. बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवचिकतेचे महत्त्व समजून कार्य करा.