नवीन वर्षात दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
डाळिंब खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. काही देशांमध्ये डाळिंब हे फळ प्रजननक्षमता, समृद्धी आणि चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जाते. याशिवाय ग्रीस आणि तुर्कीमध्ये नववर्ष सुरू झाल्यानंतर जमिनीवर डाळिंब फोडण्याची प्रथा आहे.
जपान आणि चीनमधील लोक नूडल्स दीर्घायुष्य आणि समृद्ध जीवनाचे प्रतीक मानतात. तसेच येणाऱ्या नवीन वर्षात ‘तोशिकोशी सोबा’ या पदार्थांचे सेवन केले जाते. चीनमध्ये नूडल्स गरम सूपसोबत खाण्यास दिले जातात.
दैनंदिन वापरात मसूर डाळीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. इटली आणि ब्राझीलमध्ये मसूर डाळ समृद्धीचे प्रतीक मानली जाते. डाळीच्या नाजूक साजूक नाण्यासारख्या आकारामुळे आर्थिक लाभ होतो.
जेवणात खाल्लाला जाणारा पांढरा भात समृद्धी आणि चांगल्या नशिबाचे प्रतीक मानले जाते. लॅटिन अमेरिकेत उत्सवाच्या वेळी ‘अरोज कॉन फ्रिहोल्स' हा पदार्थ आवर्जून बनवला जातो.
प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागतबी केले जाते. स्पेनमध्ये नववर्षाची एक खास परंपरा आहे. तिथे मध्यरात्रीच्या वेळी घड्याळाच्या प्रत्येक ठोक्यासोबत एक द्राक्ष खाल्ले जाते अशी प्रथा आहे.