दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन
तुपाचा वापर गोडाचे पदार्थ बनवण्यापासून ते इतर सर्व पदार्थांमध्ये तुपाचा वापर केला जातो. तुपामध्ये असलेल्या आरोग्यदायक फॅट्समुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. तसेच दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.
शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे खजूर. खजूर खाल्ल्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर रोज ५ ते ६ बदाम खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शरीरात कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात बदामाचे सेवन करावे. यामध्ये प्रथिने, आरोग्यदायक फॅट्स, आणि विटामिन्स आढळून येतात.
बाजारात सर्वच ऋतूंमध्ये केळी उपलब्ध होतात. केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच केळ्यामध्ये नैसर्गिक शर्करा, फायबर, आणि पोटॅशियम आढळून येते.
ओट्स मध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते.तसेच शरीरात निर्माण झालेला थकवा कमी करण्यासाठी आहारात ओट्सचे सेवन करावे. रक्तातील शर्करेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी ओट्स मदत करतात.