आयपीएलमधील सर्वात महाग खेळाडू कोण याची आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. यावेळी कोणाला किती पैसे मिळणार यासाठी रिटेंशनची यादी वाचा
लखनौ जाएट्ंसने ऋषभ पंतला मागच्या वेळी तब्बल 27 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र तो चांगली कामगिरी दाखवू शकला नव्हता
पंजाब किंग्जला फायनलमध्ये घेऊन येणारा श्रेयस अय्यर 26.75 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला होता. त्याने कमालीची कामगिरी केली होती
काव्या मारनच्या सनराईजर्स हैदराबादमधून खेळणाऱ्या हेनरिक क्लासेनवर तब्बल 23 कोटीची बोली लागली होती
गेले १८ वर्ष RCB कडून खेळणाऱ्या विराट कोहलीची किंमत तब्बल 21 कोटी रुपये आहे. अन्य खेळाडूंच्या तुलनेत ही किंमत कमी आहे
संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जने 18 कोटी रुपये मोजले आहेत
यशस्वी जयस्वालसाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 18 कोटी रुपयांची बोली लावली असल्याचे समोर आले आहे
दरम्यान मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह 18 कोटी, दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलसाठी 16.50 कोटी आणि गुजरात टायटन्सच्या जोस बटलरसाठी 15.75 कोटी रुपये लागले
सर्वांचा आवडता रिंकू सिंहची बोली 13 कोटी रुपयांना लागली असल्याचे समोर आले आहे