Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

बीसीसीआयने अद्याप २०२६ च्या आयपीएल हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमच्या उपलब्धतेबाबत साशंकता असल्याने आरसीबी फ्रँचायझीने पर्यायी मैदानांची चाचपणी सुरू केली होती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 12, 2026 | 09:55 PM
RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार (Photo Credit - X)

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

  • RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी!
  • चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार IPL 2026 चा थरार
  • कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी
आगामी आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या हंगामापूर्वी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघासाठी आणि त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम आयपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी उपलब्ध होणार की नाही, याबाबत असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. कर्नाटक राज्य सरकारने काही कडक अटींच्या अधीन राहून आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर सामने खेळवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
🚨 RCB IN CHINNASWAMY IS LOCKED & LOADED 🚨 – Karnataka Cabinet has approved to host the IPL matches in Chinnaswamy stadium. Government has asked KSCA to allow around 30k to 35k fans. pic.twitter.com/NHzVE5hxkx — Johns. (@CricCrazyJohns) February 12, 2026

अनिश्चिततेचे सावट संपले

बीसीसीआयने अद्याप २०२६ च्या आयपीएल हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमच्या उपलब्धतेबाबत साशंकता असल्याने आरसीबी फ्रँचायझीने पर्यायी मैदानांची चाचपणी सुरू केली होती. यामध्ये नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी आणि रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा समावेश होता. मात्र, घरच्या मैदानावर खेळण्याची परवानगी मिळाल्याने आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर

व्यंकटेश प्रसाद यांचा पाठपुरावा

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे (KSCA) नवे अध्यक्ष आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी पदभार स्वीकारल्यापासून बंगळुरूमध्ये क्रिकेटचे पुनरागमन व्हावे यासाठी मोठे प्रयत्न केले. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने पुन्हा चिन्नास्वामीवर आणण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे यश मिळाले.

सुरक्षा आणि प्रेक्षक क्षमतेच्या अटी

कर्नाटक सरकारने ही परवानगी देताना काही महत्त्वाच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. मंत्रिमंडळाने ‘कुन्हा अहवालात’ नमूद केलेल्या शिफारसींचा स्वीकार केला आहे. यानुसार, स्टेडियममध्ये एका वेळी जास्तीत जास्त ३५,००० प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाईल. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे फ्रँचायझी आणि आयोजकांसाठी बंधनकारक असेल.  मंत्री रामलिंग रेड्डी यांनी स्पष्ट केले की, अहवालात नमूद केलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षेच्या गरजा पूर्ण केल्यावरच सामन्यांचे आयोजन सुलभ होईल.

शेड्यूलची उत्सुकता वाढली

आता कर्नाटक सरकारची परवानगी मिळाल्याने बीसीसीआय पुढील काही दिवसांत आयपीएल २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. गतविजेते असल्यामुळे आरसीबीचे पारडे आधीच जड आहे, त्यात आता घरच्या मैदानाचे आणि ‘चिन्नास्वामी’च्या आक्रमक चाहत्यांचे पाठबळ मिळाल्यामुळे संघाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.

घरच्या मैदानावर आयपीएल सामने आयोजित करण्यास उत्सुक RCB, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय-सक्षम कॅमेरे बसवण्याचा केला प्रस्ताव

Web Title: Rcb to play home matches at chinnaswamy stadium ipl 2026 karnataka govt nod

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:55 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2026
  • Karnatak Govermernt
  • RCB

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
2

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
3

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
4

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.