खरंच डोळे फडफडणे अशुभ असतात? ( फोटो सौजन्य - Social Media )
देशभरात डोळे फडफडण्या विषयी अनेक कथा आणि कथानक आहेत, काही यांच्यावर विश्वास ठेवतात तर काही यांना अंधविश्वास मानतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा पुरुषांचा उजव्या बाजूकडील डोळा फडफडतो तेव्हा ते शुभ मानले जाते. पुरुषाचा उजवा डोळा फडकणे हे संकेत असते कि पुरुषला धनलाभ होणार आहे किंवा कामात पदोन्नती होणार आहे.
जेव्हा स्त्रीचा उजवा बाजूकडील डोळा फडफडतो तेव्हा ते अशुभ मानले जाते. स्त्रीचा उजवा डोळा फडकणे हे संकेत असते कि त्या स्त्री बरोबर काही तर वाईट घटीत होणार आहे. कोणती तरी अप्रिय घटना घडणार आहे.
याउलट, जेव्हा स्त्रीचा डाव्या बाजूकडील डोळा फडकतो तेव्हा तेव्हा ते शुभ मानले जाते. हे धनलाभ किंवा कामे मार्गी लागणार असल्याचे संकेत असते.
जेव्हा पुरुषाचा डावा डोळा फडकतो तेव्हा ते अशुभ मानले जाते. एक तर अपघात होण्याचे संकेत असतात किंवा काही तरी अशुभ घटना घडणार आहे, असे संकेत असतात.