Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुशांतच्या रहस्यमय मृत्यूला झाली 4 वर्ष, आजही चाहत्यांचे प्रेम झाले नाही कमी

बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची यंदा चौथी पुण्यतिथी आहे. सुशांतच्या निधनाने त्याच्या जवळचे सगळेच दु:खी आहेत. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच सुशांत एक चांगला माणूसही होता.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 15, 2024 | 03:58 AM
सुशांतच्या रहस्यमय मृत्यूला झाली 4 वर्ष, आजही चाहत्यांचे प्रेम झाले नाही कमी
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची यंदा चौथी पुण्यतिथी आहे.  सुशांत सिंग राजपूत हा बॉलिवूडचा तो चेहरा आहे, जो कोणीही विसरू शकत नाही. सुशांतच्या निधनानंतर त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्याचे चाहतेही त्याची आठवण काढतात. सुशांतने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली, आणि जेव्हच तो हे जग सोडून गेला तेव्हा सर्वांचे डोळे ओलावले. 14 जून 2020 रोजी दुपारी जेव्हा सुशांत सिंगच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण देशात घबराट पसरली. आज सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात त्याची कारकिर्दीची सुरुवात.

 

सुशांत सिंगच्या चेहऱ्यावर नेहमीच एक सुंदर हास्य असायचं. सुशांतचे आडनाव ‘गुलशन’ हे फार कमी लोकांना माहीत आहे. सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी पाटणा येथे झाला. पाच भावंडांमध्ये सुशांत सर्वात लहान होता. सुशांतच्या आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब पाटण्याहून दिल्लीला स्थलांतरित झाले.

 

सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिकांमधून केली. 2008 मध्ये स्टार प्लसचा रोमँटिक ड्रामा ‘किस देश में है मेरा दिल’ हा तिचा पहिला शो होता, त्यानंतर तिला झी टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘पवित्र रिश्ता’ने प्रसिद्धी मिळाली.

 

2013 मध्ये आलेल्या ‘काय पो चे’ या सिनेमातून त्याने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘पीके’, ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी’, ‘छिछोरे’ मध्ये काम केले. 2016 चा चित्रपट ‘एम. एस. ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये त्याने महेंद्रसिंग धोनीची मुख्य भूमिका साकारली होती, जी सर्वांनाच आवडली होती.

 

या नंतर सुशांत दिल बिच्चारा या ओटीटीने रिलीज केलेल्या चित्रपटात दिसला. हा चित्रपट सुशांतच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाला चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळाले. आणि अजूनही त्याचा कोणताही चित्रपट पाहताना त्याची आठवण ही होतेच.

 

सुशांत ला अभिनयासोबतच स्पोर्टची सुद्धा आवड होती. तो मिळेल त्या वेळेला टेनिस खेळात असे, आणि त्याला खेळ खेळून त्यातून खूप आनंदसुद्धा मिळायचा.

 

सुशांत सिंग राजपूतचे वयाच्या 34 व्या वर्षी 14 जून 2020 रोजी निधन झाले. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले होते पण सुशांतच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याची हत्या करण्यात आली आहे किंवा सुशांतला असे करण्यास भाग पाडण्यात आले आहे. सुशांतचे कुटुंब आणि चाहते अजूनही न्यायाची मागणी करत आहेत.

Web Title: Its been 4 years since sushant mysterious death fans have not lost their love even today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2024 | 01:25 PM

Topics:  

  • Death Anniversary
  • sushant singh rajput

संबंधित बातम्या

Former PM Manmohan Singh Death Anniversery: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या ७ निर्णयांनी बदलली देशाची दिशा आणि दशा
1

Former PM Manmohan Singh Death Anniversery: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या ७ निर्णयांनी बदलली देशाची दिशा आणि दशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.