सूर्यपुत्र कर्ण मग सूर्यकन्या कोण? (फोटो सौजन्य - Social Media)
तपती ही वयाने लहान होती तर सावित्री वयाने मोठी. तपती आणि कौरव यांचा फार मोठा संबंध आहे. तपतीसाठी वर शोधत होते. सूर्यदेवांना एक सात्विक असा पुरुष तपतीसाठी हवा होता.
संवरन राजा सूर्याची फार उपासना करत होता. सूर्यदेव तपतीला घेऊन देवलोकातून पृथ्वीवर आले होते. तेव्हा सूर्यदेव तपतीला एका पर्वतावर सोडून निघून गेले. त्याच परिवर्तावर राजा संवरनपण सूर्योपासना करत होता.
त्याने तपतीला पहिले आणि बघताच क्षणी मोहित झाला. तपतीच्या मनातही तो बसला. तेव्हा तिने त्याला घोर सूर्योपासना करण्याचे सांगितले तर त्याचे विवाह होईल.
तपतीसाठी सूर्योपासनेत राजा इतका मग्न झाला की त्याला प्रजेचेही भान राहिले नाही तेव्हा गुरु वसिष्ठांनी सूर्यदेवांना सांगितले आणि त्या दोघांचा विवाह करून दिला.
तपती आणि राजा संवरांना पुढे कुरु नावाचा पुत्र झाला आणि तिथूनच कुरुवंशाला सुरुवात झाली.