पक्षांच्या विलुप्त होण्यामागचं कारण आहे तरी काय? सर्वात जास्त जबाबदार कोण? जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
गेल्या 1,30,000 वर्षांत मानवामुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्यामुळे पर्यावरणातील पक्ष्यांची कार्यात्मक विविधता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. एका नव्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.
अभ्यासात असे आढळून आले की या विलुप्ततेचा परिणाम म्हणजे, तीन अब्ज वर्षांचा अद्वितीय उत्क्रांती इतिहास देखील नष्ट झाला.
ब्रिटनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी सांगितले की, प्लेस्टोसीन युगाच्या समाप्तीपासून 'डोडो' आणि 'काउई ओ' या पक्ष्यांच्या किमान 600 प्रजाती मानवामुळे नामशेष झाल्या आहेत. हा कालावधी 2.6 दशलक्ष वर्षांपूर्वीपासून 11,700 वर्षांपूर्वीपर्यंतचा आहे, जेव्हा आधुनिक मानव जगभर पसरू लागला.
डोडो हा कबूतर कुटुंबातील एक जड, कमी उडणारा पक्षी आहे आणि त्याचे मूळ निवासस्थान मॉरिशस बेट होते, तर 'कौई ओ' चे निवासस्थान मूळचे हवाईयन बेट होते आणि 2023 मध्ये या पक्षांच्या नामशेष होण्याची घोषणा करण्यात आली.
प्रकाशित झालेल्या या अभ्यासात लेखकांनी लिहिले आहे की, 'गेल्या 1,30,000 वर्षांत ज्ञात पक्ष्यांच्या प्रजातींपैकी पाच टक्के प्रजाती नामशेष झाल्या आहेत.
बर्मिंगहॅम विद्यापीठाचे प्रमुख संशोधक टॉम मॅथ्यू म्हणाले, जेव्हा प्रजाती नामशेष होतात तेव्हा पर्यावरणीय विविधतेतील त्यांची विशेष भूमिकाही संपुष्टात येते.