नवासाला पावणारा गणपती' अशी ओळख असलेला लालबागचा राजा राजेशाही थाटात विराजमान
मुंबईतील अतिशय प्रसिद्ध मंडळांपैकी एक म्हणजे लालबागचा राजा. या मंडळाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. तिथे बाजार निर्माण होण्यासाठी अनेक कोळी बांधवानी नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्यामुळे लालबागच्या राजाला नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखले जाते.
यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटामध्ये बसवण्यात आला आहे. यासाठी खास सुवर्ण गजानन महाल तयार करण्यात आला आहे.
बाप्पाची मूर्ती सोनेरी अलंकारांनी सजवण्यात आली आहे.सोन्याचा मुकुट, राजेशाही हार, तोडे इत्यादी अनेक सोन्याचे अलंकार बाप्पाला घालण्यात आले आहेत.
लालबागच्या राजाचे आणि भाविकांचे अनोखे नाते आहे. दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक मुंबईमध्ये दाखल होतात. लालबागच्या राजावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे.
लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून अनेकांचे डोळे भारावून गेले आहेत. लाल पितांबर आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या बाप्पाचा लुक अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारा दिसत आहे.