राधिका मर्चंडचे लग्नातील निरोप सभारंभातील फोटोवर टाका एक नजर त्यात तिचा घागरा सोन्याच्या धाग्यांनी तयार केला आहे. Radhika merchant (फोटो सौजन्य- Instagram)
अनंत-राधिका हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत त्यांच्या लग्न आधीचे सगळे सोहळे हे मोठ्या थाटामाटा आणि यशस्वी पार पडले आहेत. तसेच राधिकाचे विदाईचे फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये ती चंद्रासारखी सुंदर दिसत आहे.
राधिकाचे हे फोटो पाहून कोणीही सहज घायाळ होऊ शकते असा पोशाख तिने परिधान केला आहे. राधिलकाने विदाईच्या वेळी फेमस फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा खऱ्या सोन्याच्या धाग्याने सजवलेला सुंदर लाल रंगाचा लेहेंगा घातला होता.
राधिकाने या विदाईच्या वेळी परिधान केलेल्या या लाल सिनेरी लेहेंग्याचे नक्षी काम हे खूप सुंदर आणि बनारसी होती. राधिकाने हा लुक अत्यंत पारंपरिक गुजराती पद्धतीत कॅरी केला होता.
तसेच राधिकाने या लेहेंग्यावर बनारसी डिझाईनचा जाड दुप्पटा देखील घेतला होता, तसेच या लेहेंग्यावर तिने सोन्याचे डिझाईन असलेले कारचोबी ब्लाऊससुद्धा परिधान केला होता. ज्यामुळे तिच्या लुक अजून खुलून आले होते.
राधिकाने हा खास विदाईचा लुक पूर्ण करण्यासाठी सुंदर दागिने आणि गळ्यात भरीव हार घातले होते . तसेच तिने केसांमध्ये भरपूर गाजरे माळले होते. या सगळ्यामुळे तिचा लुक खूप अप्रतिम दिसत होता.
तसेच या लाल-सोनेरी लेहंग्यावर राधिकाने खूप साधा आणि सोपा मेकअप केला होता त्यामध्ये तिने फाउंडेशन, ब्लुश, आयशॅडोव आणि या सामग्रीचा वापर केला होता. ती या सगळ्यासह खूप मोहक आणि सुंदर दिसत होती.
तसेच राधिकाने या लाल-सोनेरी लेहंग्यावर परिधान केलेले सगळे दागिने हे तिच्या बहिणीचे आणि आईचे होते असे प्रसिद्ध फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने सांगितले आहे.