लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
लिंबूमध्ये विटामिन सी आणि सायट्रिक ऍसिड इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाणी उपाशी पोटी नियमित प्यावे.
बीटरूटमध्ये बीटालेन्स आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येते, ज्यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. बीटचा रस प्यायल्यामुळे शरीराला लोह मिळते. रक्ताची कमतरता भरून निघते.
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन अँटीऑक्सिडंट्स असते, ज्यामुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरात तुम्ही दोन किंवा तीन ग्रीन टी पिऊ शकता.
लसणामध्ये सल्फर संयुगे असतात, ज्यामुळे लिव्हरमधील एंजाइम सक्रिय होतात आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले अॅलिसिन आणि सेलेनियम लिव्हर स्वच्छ करण्यासाठी मदत करते.
हळद नैसर्गिकरित्या लिव्हरला डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करते. यामध्ये कर्क्युमिन नावाचे सक्रिय संयुग आढळून येते, जे लिव्हरला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव करते. त्यामुळे उपाशी उपाशी पोटी तुम्ही हळदीचे पाणी किंवा दूध पिऊ शकता.