6 वेळा मृत घोषित करूनही पुन्हा जिवंत परतलाय... हा माणूस म्हणजे जणू पृथ्वीवरील अमरचं
अजीजीचा पहिला मृत्यू त्याच्या कामाच्या ठिकाणी गंभीर जखमी झाल्यामुळे झाला. उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले, ज्यानंतर कुटुंबियांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले पण शवपेटी नेत असतानाच ती अचानक हलू लागली आणि ती उघडताच अजीजी उठून उभा राहिला.
दुसऱ्यावेळी अजीजीला मलेरिया झाला होता, ज्यात त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. पण पुन्हा तेच घडले शवपेटीतून त्याला घेऊन जात असतानाच अचानक त्याचे डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला
तिसऱ्या वेळी अजीजीचा गंभीर अपघात झाला ज्यात तो कोमात गेला. उपचारादरम्यान त्याचा श्वास थांबला ज्यानंतर डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले पण चमत्कार थांबतोय कुठे... काही वेळातच अजीजी पुन्हा श्वास घेत जिवंत झाला
चाैथ्या वेळी अजीजीला सापाने दंश केला ज्यात त्याचा मृत्यू झाला पण यावेळी गावकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली त्यांनी त्याला शवपेटीत भरलं पण खरं पण ही शवपेटी पुरली नाही तर तीन दिवस त्यांनी त्याच्या जिवंत होण्याती वाट पाहिली. अखेर तीन दिवसांनंतर त्यांनी अंत्यविधीसाठी तयारी सुरु केली पण अचानक त्याने पुन्हा डोळे उघडे केले, ज्यानंतर संपूर्ण गावकरी घाबरले. त्यांना वाटू लागलं की अजीजी हा साधा माणूस नाही
या सर्वच गोष्टींना कंटाळून अजीजीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला ज्यात पुन्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पण काही वेळातच तो जिवंत झाला. यानंतर लोकांच्या मनामधील भिती आणखीन वाढली आणि ते त्याला शैतान समजू लागले
सहाव्या वेळी मात्र लोकांनी त्याला भूत समजून त्याच्या घराला आग लागली, ज्यात सहाव्यांदा त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण घर जळून खाक झालं पण अजीजी पुन्हा यातून जिवंत बाहेर आला, ज्यानंतर गावकऱ्यांनी त्याला वाळीत टाकलं. तब्बला सहा वेळा मृत्यूला मात करणारा अजीजी एकाकी जीवन जगत आहे. मरुणही पुन्हा जिवंत होण्यामागचं त्याच कोड आजवर विज्ञानही उलगडू शकलं नाही