‘मॉन्स्टर’चा ट्रेलर रिलीज, अभिनेता मोहनलाल दिसतोय सरदार लकी सिंगच्या दमदार भूमिकेत
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल त्याच्या आगामी 'मॉन्स्टर' चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या थ्रिलरमध्ये मोहनलाल पगडी घातलेल्या सरदार लकी सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज केला आहे. व्यासख दिग्दर्शित, सस्पेन्स ड्रामामध्ये लक्ष्मी मंचू देखील मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलर शेअर करताना मोहनलाल यांनी लिहिले, "#मॉन्स्टरचा अधिकृत ट्रेलर आता आऊट! (sic)." ट्रेलरला यूट्यूबवर काही तासांतच 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्ही ट्रेलर देखील पाहू शकता-