जगातील ३ देशांच्या ध्वजावर आहे तिरंग्याचा रंग; हुबेहूब कलर असूनही दिसायला वेगळे...
आता आम्ही तुम्हाला अशा ३ देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या राष्ट्रीय ध्वजांमध्ये तिरंग्यासारखेच रंग आहेत, परंतु त्या रंगांचाअर्थ आणि ध्वजांच्या रचनेत फरक आहे.
भारताचा राष्ट्रीय ध्वज, तिरंगा हा २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारण्यात आला. याची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली. यात भगवा, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आहे. भगवा रंग हा धैर्य, त्यागाचे प्रतीक आहे तर पांढरा रंग सत्य, शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे.
आता जगात इतर देशही आहेत ज्यांच्या ध्वजातही भगवा, हिरवा आणि पांढरा रंग आहे पण या रंगाचे अर्थ मात्र दुसऱ्या देशात वेगळा आहे. यातील पहिला देश आहे "आयव्हरी कोस्ट". या देशाच्या ध्वजातही भारतीय तिरंग्याप्रमाणे रंग आहेत पण हे रंग ध्वाजात आडवे असून यातील केशरी रंगाचा अर्थ प्रगती आणि लोकांच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग शांती आणि एकतेचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग जंगले आणि नैसर्गिक संपत्तीची समृद्धता दर्शवतो.
यादीतील दुसऱ्या देशाचे नाव आहे "आयर्लंड" यातदेखील नारिंगी, पांढरा आणि हिरवा रंग असून तो उभ्या पट्ट्यांमध्ये आहे. आयर्लंडचा ध्वज १९१९ मध्ये स्वीकारण्यात आला होता, जेव्हा देश ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी लढत होता. आयर्लंडच्या ध्वजातील हिरवा रंग देशातील कॅथोलिक समुदायाचे आणि देशातील हिरवळीचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट समुदायांमधील शांती आणि एकतेचे प्रतीक आहे. तर नारिंगी रंग विल्यम ऑफ ऑरेंजपासून प्रेरित प्रोटेस्टंट समुदायाचे प्रतिनिधित्व करतो.
यादीतील शेवटचा देश म्हणजे "नायजर" या ध्वजातही हिरवा, केशरी आणि पांढरा रंग असून याच्या मध्यभागी नारिंगी वर्तुळाकार चिन्ह आहे. हा ध्वज १९५९ मध्ये स्वीकारण्यात आला. नारिंगी रंग सहारा वाळवंटातील वाळू आणि देशाच्या उत्तरेकडील भूमीचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग देशाच्या दक्षिणेकडील भागातील हिरवळ आणि शेतीचे प्रतिनिधित्व करतो. ध्वजातील नारिंगी वर्तुळ सूर्याचे प्रतीक आहे, जो जीवन आणि उर्जेचा स्रोत आहे.