हातमाग साड्यांचा थाट न्यारा!
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी जगभरात प्रसिद्ध आहे. बदलत्या काळात सुद्धा सर्वच महिलांना पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते. पैठणीसोबतच हॅण्डलूम सिल्क साडी, बनारसी साडी, कांजीवरम साडी हॅण्डलूक सिल्क प्रकारात येतात.
हातमागावर सिल्क साड्यांसोबतच कॉटन साड्या देखील विणल्या जातात. त्यामध्ये माहेश्वरी, गढवाल, कोटा साडी इत्यादी अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. कॉटनच्या साड्या सणावाराच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने नेसल्या जातात.
हॅण्डलूम लिनन साडी वजनाने अतिशय हलकी आणि मऊ असते. ही साडी नेसण्यासाठी फार कमी वेळ लागतो. घाईगडबडीच्या वेळी तुम्ही कॉटन लिनन साडी नेसू शकता.या साड्या प्रामुख्याने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ इत्यादी भागांमध्ये तयार केल्या जातात.
मध्य प्रदेशात तयार होणारी चंदेरी सिल्क साडी सर्वच महिलांना खूप जास्त आवडते. तलम कपडा ही चंदेरी साड्यांची विशेष ओळख आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या दिवशी चंदेरी सिल्क साडी नेसण्यास प्राधान्य देतात.
सर्वच तरुणाईला भुरळ घालणारी साडी म्हणजे कलमकारी साडी. ऑफिसवेअर, पार्टीवेअर किंवा कुठेही बाहेर फिरायला जाताना तुम्ही कलमकारी साडी नेसू शकता. बारीक नक्षीकाम करून तयार करण्यात आलेल्या साड्या अतिशय स्टायलिश दिसतात.