नीता अंबानींच्या राजेशाही साडीचा थाटाचं न्यारा! दिवाळी पार्टीसाठी निवडलेली पाहून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क
दिवाळी कार्यक्रमासाठी नीता अंबानींनी स्वदेश रामावली साडीची निवड केली होती. रामावली साडी खास बनारसचे प्रसिद्ध वस्त्रकलाकार आणि मास्टर कारागीर अजय भोज यांनी तयार केली आहे. तयार करण्यात आलेली पूर्ण साडी हातमागावर विणलेली आहे. साडी तयार करण्यासाठी सुमारे ५ महिन्यांचा कालावधी लागला.
नीता अंबानींनीसाठी विणण्यात आलेल्या साडीवर राम लाल रंगाच्या कापडावर रेशमी धाग्यांच्या मदतीने सुंदररीत्या विणण्यात आले आहे. त्यामुळे या साडीला आध्यात्मिक आणि शाही लुक देण्यात आला आहे. प्रभू राम, रामावली याशिवाय साडीच्या पदरावर लक्ष्मीची पाऊल आणि स्वस्तिक डिझाईन सुद्धा विणण्यात आले आहे.
भारताच्या पारंपरिक कला आणि आध्यात्मिक वारशाचे सुंदर दर्शन नीता अंबानींच्या साडीमध्ये घडते. त्यांनी खास रस्ट रंगाची पारंपरिक आणि सोनेरी नक्षीकाम असलेल्या बनारसी साडीची निवड दिवाळी पार्टीसाठी केली होती. संपूर्ण साडीवर सिल्कच्या धाग्यांनी राम असे लिहिले आहे. भगवान विष्णूंच्या पवित्र चरणांसोबतच कमळाच्या फुलांची नक्षी सुद्धा करण्यात आली आहे.
साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी सुंदर आणि देखणी पारंपरिक टेंपल ज्वेलरी स्टाईल केली आहे. जडावू हार गळ्यात अतिशय शोभून दिसत आहे. या नेकलेसवर रंगीबेरंगी मोती असून हाराशी मॅचिंग असे कानातले परिधान केले आहे. लुक पूर्ण करण्यासाठी हातांमध्ये लाल रंगाच्या बांगड्या आणि झुमकी असलेले हेवी डिझाईन कडे परिधान केले आहेत.
नीता अंबानी यांचा साडीवरील मेकअप कायमच नॅचरल असतो. ब्लश, डोळ्यांवर सुंदर काजल, आयलिनर, हलक्या रंगाची लिपस्टिक लावून मेकअप केला आहे. याशिवाय केसात मोगऱ्याचा गजरा आणि कपाळावर असलेली लाल टिकलीतील लुक अधिकच सुंदर आहे.